- अजित पवार यांचे सत्ताधाऱ्यांना आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०१९) :- ईव्हीएम बद्दल अनेकांची वेगववगळी मतं आहेत. मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक निकाल एकतर्फी लागले आहेत असे काही जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी गडबड आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सांगवीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मा. आ. विलास लांडे, मा. उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, अतुल शितोळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगामध्ये ताकदीच्या देशात मशीनद्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे की, किमान लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक तरी बॅलेट पेपरवर घ्याव्यात शंका दूर होतील.
चिप बदलली जाते, रिमोट ने काहीतरी केले जाते असे सांगितले जाते. त्यामुळे लोकांचा १०० टक्के गैरसमज दूर करण्याकरिता निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हरकत नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.















