न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०१९) :- विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्ति करुन भविष्य घडवावे. राजकारणाच्या मागे न लागता समाजकारण करावे. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून भविष्यात समाजासाठी चांगले काम करावे, असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी आकुर्डी येथे केले.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दहावी आणि बारावीच्या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि सत्काराच्या कार्यक्रमाचे आकुर्डी येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी काकडे बोलत होते.
कार्यक्रमाल महापौर राहूल जाधव, जहागीरदार अमरजीत राजे बारगळ, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सर्यकांत गोफणे, घन:शाम हाके, दीपक भोजणे आदी उपस्थित होते. प्रवीण काकडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ‘धुमस’ चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलतडे, डॉ. गोवर्धन, अभिनेता रोहन पाटील, कार्तिक पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
महापौर राहुल जाधव म्हणाले, धनगर समाजाच्या मागणीनुसार मोरवाडी पिंपरी येथे आहिल्याबाई होळकर यांचा मोठा पुतळा बसविण्यात येईल.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महावीर काळे यांनी केले. सूत्रसंचालन यशोदा नाईकवाडे यांनी केले.















