न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने शिवशाही व्यापारीसंघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, सचिव आशिष वाळके, प्राध्यापक धनंजय भिसे, शिवसेना मा. विभागप्रमुख संजय ससाणे, आरूण जोगदंड, आमोल तेलंगे, अर्जुन दाखले, भिमा वाघमारे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष संजय धुतडमल, आण्णा कसबे, आल्लाट सर, मोहन वाघमारे, भिम वाळके, सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे, तुकाराम शिंदे, सचिन तेलंगे, सचिन घोलप, हनुमंत नाना कसबे, दशरथ सकट आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.















