न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाबाबत औद्योगिक न्यायालयाने अंतिम आदेश देऊन कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन मा. उपनिबंधक, श्रमिक संघ, पुणे यांची प्रशासक म्हणुन नेमणुक केलेली आहे. याबाबत अंबर चिंचवडे यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मी श्री. अंबर किसन चिंचवडे या संबंधाने जाहीर निवेदन करीतो की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना असुन सदर संघटनेचे ६,००० हुन अधिक सभासद आहेत.
मी कर्मचारी महासंघामध्ये सन २०१८-१९ या कालावधीकरीता खजिनदार या पदावर रितसर निवडणुकीद्वारे नियुक्त झालो होतो, सदर पदाचे कामकाज करीत असताना महासंघाच्या अध्यक्ष यांच्या कामगार हितांच्या विरोधांत काही गोष्टींना मी विरोध केल्याने, त्यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी मला संघटनेच्या खजिनदार या पदावरुन घटना व नियमबाह्यपणे काढुन टाकले होते. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे मी दि. ११/०६/२०१८ रोजी मा. कामगार आयुक्त सो. यांचेकडे तक्रार दाखल केली.
याबाबत मा. कामगार आयुक्त यांचेकडे या संबंधाने वेळोवेळी सुनावणी होऊन महासंघाचे सदरचे कृत्य हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे त्यांची खाञी झाल्याने त्यांनी मला दि. ०१/०४/२०१९ रोजी सदरचा वाद मे. औद्योगिक न्यायालयात उपस्थित करणेस संमतीपञ दिले.
त्यानुसार मी ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड. श्री.संतोष म्हस्के यांचेमार्फत मा. औद्योगिक न्यायालयामध्ये मे. श्री.एम. आर. कुंभार, सदस्य औद्योगिक न्यायालय, पुणे यांचेकडे दावा क्र. ICTU २/२०१९ दि.०३/०५/२०१९ रोजी अन्वये रितसर दावा दाखल केला होता. सदर दाव्यामध्ये आवश्यक ती कागदपञे सादर करणेत आलेली होती. सदर कागदपञांची शहानिशा होऊन मा. औद्योगिक न्यायालयाने कर्मचारी महासंघावर संघटनेचे कामकाज करण्यास मनाई करुन संघटनेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालणेचा अंतरिम आदेश देणेत आला होता.
तद्नंतर सदर दाव्याची वेळोवेळी सुनावणी होऊन दोन्ही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकुन मा. औद्योगिक न्यायालयाचे मे. श्री. एम. आर. कुंभार, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी दि. १८/०७/२०१९ रोजी अंतिम आदेश देऊन कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन मा. उपनिबंधक, श्रमिक संघ, पुणे यांची प्रशासक म्हणुन नेमणुक केलेली आहे. तसेच सदर आदेशामध्ये संघटनेचा संपुर्ण ताबा व सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेवुन प्रशासकांनी आगामी तीन महिन्यांत सभासदांची यादी तयार करावी व संघटनेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करावा. तसेच याबाबतचा चौकशी अहवाल मा. औद्योगिक न्यायालयाकडे सादर करावा, असेही आदेशात नमुद केलेले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ स्थापन केला आहे. या महासंघात काही कालखंडापासून लोकशाही नाही तर एकाधिकारशाही सुरू होती. बेबंदशाही सुरू होती. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू होते. संघटनेत कर्मचारी हित कमी आणि एकाधिकारीशाही अधिक होती. आमचा आक्षेप संघटनेस किंवा व्यक्तीस नसून वृत्तीस आहे. न्यायालयाकडे दहा मागण्या केल्या होत्या. त्यावर दोन मागण्याचा स्वीकार करून न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी निर्बंध घातले होते. त्यानंतर आता प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यावरून महासंघात चुकीचा कारभार सुरू होता हे सिद्ध झाले आहे. आता कर्मचारी महासंघात लोकशाही प्रस्थापित होणार आहे.”
याबाबत कर्मचारी महासंघाचे मधुकर रणपिसे, संभाजी पार्टे, बाळासाहेब कापसे, विलास नखाते, दिलीप काटे, मिलींद काटे, नारायण वाघेरे, संदेश नढे, गिरीष सलगरकर, अविनाश ढमाले, बाबु चिंचवडे, सुभाष लांडे, धनाजी नखाते, हेमंत जाधव, राजेश चव्हाण, राजेद्र वाघेरे, राजेंद्र वाघमारे, राम येवले, हेमंत पिंजन, मंगेश कोंढाळकर, नरेंद्र दुराफे, विवेक शिर्के, अविनाश तिकोने, सुनिल कलापुरे, राजेश बांदल, योगेश रसाळ, प्रदीप टकले, अक्षय टोके, राजु केंगार, योगेश वंजारे, सुधाकर मोहिते, किरण सौदा, नारायण धोञे, प्रभाकर तावरे, आकाश बनसोडे, नितीन ठाकर, अमित जाधव, अनिल राऊत, रणजीत भोसले, संदीप गव्हाणे, अविनाश वाघेरे, गणेश लांडे, संजय लांडगे, विजेंद्र आठवाल, निलेश घुले, उमेश साठे, प्रमोद गवळी, नवनाथ शिंदे, सत्यवान वाळके, बाळासाहेब साठे, लक्ष्मण बंडगर, रविंद्र काळे, पलाश देवकर, बाप्पु गायकवाड, गोरख भालेकर, धनंजय भालके, सागर भंडारे, धनंजय थोरवे, देवा आसवले, कल्पेश कापसे, पंकज गावडे, तुषार काळभोर, सुरेश माने, महादेव साबळे, सतिश कांबळे, विनोद कुसाळकर, अनिल गायकवाड, बाळासाहेब मालुसरे, नाना मिसाळ, विजय नलावडे, मयुर खराडे, कृष्णा पारघे, रविंद वाघेरे, रविंद्र वाळुंजकर, राजु अपार, सुनिल झेडे, विकास कुदळे, ज्ञानेश्वर काळभोर, निलेश जाधव यांच्यासह अनेकांनी समाधान व्यक्त केले, असे या पत्रकात चिंचवडे यांनी म्हटले आहे.















