न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाच्यावतीने विविध शाळांमधून ध्रुमपानाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे अभियान शहरातील एकूण नऊ शाळांमधून राबविण्यात आले असून त्यात २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या अभियानांतून प्रभावित होऊन ३०० विद्यार्थ्यांनी व्यसनाला निरोप दिला. डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज आकुर्डी, कमल नयन बजाज स्कूल, विद्यानंद भवन स्कूल, सेंट उर्सुला ज्युनिअर कॉलेज, नॉव्हेल हॉटेल मॅनेजमेंट, नॉव्हेल ज्युनिअर कॉलेज, सिटी प्राईड कॉलेज, मॉडर्न ज्युनिअर कॉलेज या कॉलेजमधून ध्रुमपान जनजागृतीबाबत अभियान राबविण्यात आले.
हे अभियान रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा व युथ डायरेक्टर दिपा जावडेकर आदी सदस्य उपस्थित होते.
कर्करोग तज्ज्ञांपासून पासून हृदयविकार तज्ञापर्यंत वैद्यकीय तज्ञ धूम्रपान व तंबाखू सेवनाने बाधित रुग्ण तपासतच असतात. म्हणजेच धूम्रपान व तंबाखू यांचे विकार हे केवळ तोंड अथवा फुफ्फुसे यातच मर्यादित नसून इतर अनेक व्याधींसाठी कारणीभूत ठरतात तरी ध्रुमपान करणे टाळावे अशी जनजागृती शहरातील विविध शाळांमधून रोटरी क्लब ऑफ प्राधिकऱणच्यावतीने करण्यात आली.















