न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- कै. राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जयराम शिंदे यांच्या हस्ते त्यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट देण्यात आली.
बैलगाडीची प्रतिकृती भेट दिल्याबद्दल अजित पवार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच आपल्या भाषणातून त्यांनी उपस्थितांना बैलगाडीची महती पटवून सांगितली. याप्रसंगी संदेशकुमार नवले, संजोग वाघेरे, आण्णा बनसोडे, विलास लांडे, जयराम शिंदे, अजय खराडे आदी उपस्थित होते.















