न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- कुदळवाडी परिसरात कचऱ्याची समस्या आहे. तसेच या भागात कचरापेटी (स्टीलची लोखंडी डस्टबिन) नसल्यामुळे आजूबाजूचे लोक कचरा रस्त्यावरच टाकीत असत. त्याबाबत स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे या परिसरात ठिकठिकाणी कचरापेटी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
मनपा आयुक्त हर्डीकर यांनी या मागणीची दखल घेत, प्रशासनाला त्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. कुदळवाडीतील भैरवनाथ मंदिर, विठ्ठल मंदिर, मोरे पाटील चौक, दुर्गामाता मंदिर, घृष्णेश्वर मंदिर, विरोबा मंदिर, महादेव मंदिर, चिखली आदी परिसरात कचरापेट्या (स्टीलची लोखंडी डस्टबिन) बसविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे नागरिक कचरा रस्त्यावर न टाकता थेट कचरापेटीत टाकत असून, परिसरातील रस्ते स्वच्छ राहत आहेत. दिनेश यादव यांच्या पाठ्पुराव्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.












