न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- महिलांच्या बचत गटांना महिलांविषयक कायदयांची जनजागृती करण्याकरीता प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जात असून सक्षमीकरणासाठी उपयुक्त असल्याचे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गंत महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजनेचे दुसरे प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
आज नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, माई ढोरे, आरती चोंधे, सुनिता तापकीर, झामाबाई बारणे, सविता खुळे, चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, नगरसदस्य नामदेव ढाके, सागर आंगोळकर, राजू बनसोडे, चंद्रकांत नखाते, हर्षल ढोरे माजी नगरसदस्य उमा खापरे, राजेंद्र राजापुरे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती रहाटकर म्हणाल्या, महिला ही कुटूंबासाठी सतत झटत असते, घरासाठी त्याग करत असते, ती घराची आधारस्तंभ असते. सर्व महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येवून स्वताच्या पायावर उभे राहायला पाहिजे. बचत गटांनी कल्पकतेने आपले काम केले पाहिजे. प्रज्वल योजनेत महिलांविषयक कायदे व बचत गटाच्या योजनांची त्यांनी माहिती दिली. शहरातील बचत गटांना वेगवेगळया राज्यात प्रशिक्षण शिबिरे अथवा वस्तूंच्या प्रर्दशनासाठी जावयाचे असलेस अशा महिलांना महापालिकेने सहाय्य देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही त्या यावेळी म्हणाल्या.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड ही श्रमिकांची नगरी आहे. काही कुटूंबांना प्रपंचाचा गाडा एका माणसाला हाकावा लागतो, त्यामुळे अशा कुटूंबाला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अशा परीस्थितीत महिलांनी हातभार लावला पाहिजे. शहरातील बचत गट अनुदाना पर्यंत जातात परंतू पुढे ते काम थांबवतात दरवर्षी महापालिका सुमारे १०० कोटी रुपये खर्च करते. भविष्यात बचत गटांच्या शक्ती मुळे देश पुढे गेल्याशिवाय राहाणार नाही असेही ते म्हणाले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, बचत गटांनी डिजीटल साधनांचा अवलंब केला पाहिजे. खरेदी विक्री करताना स्वॅप मशिन किंवा ऍपचा वापर मोठया प्रमाणात केला पाहिजे. तसेच बचत गटांचे आर्थिक व्यवहार व लेखे व्यवस्थित जतन करुन ठेवणे गरजेचे आहे. त्याचा फायदा व्यावसाय वाढीच्या साठी व बँकांकडून कर्ज उभारणीस मदत मिळू शकते असे ते म्हणाले.
महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे म्हणाल्या, शहरातील बचत गट चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी उदयोगां बरोबर घरातील लहान मुले, मुली यांच्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे.
माजी नगरसदस्या उमा खापरे म्हणाल्या, महिला सक्षम झाल्या पाहिजेत त्यासाठी शासनाने विविध योजना कार्यांन्वीत केल्या आहेत. प्रज्वल योजनेत ३ टप्यात प्रशिक्षण दिले जाते. एकाच जिल्हयात एकच वस्तू तयार करणे, स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत प्रशिक्षण, वस्तू ची विक्री करण्यासाठी प्रयत्न करणे सुमतीबाई सुपळीकर कर्ज योजनेत बिनव्याजी कर्ज पुरवठा केला जातो असेही त्या म्हणाल्या. .
महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथील शलाका साळवी यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. जनधन योजनेत बँक खाते उघडणे हे आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे, बेटी बचाव बेटी पढाव, कन्या समृध्दी योजना, मातृवंदन योजना, अटल पेन्शन योजना या योजनांची त्यांनी माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथील वंदना कवठे यांनी बचत गटांचे फायदे विषद केले. आर्थिक, सामाजिक व राजकीय विकास झाला पाहिजे. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून कलागुणांना वाव मिळत असतो असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमा खापरे यांनी केले, सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर, आभार सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी मानले.











