न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- शिवसेनेच्या वतीने मावळ लोकसभा क्षेत्रातील पिंपरी-चिंचवड व मावळ विधानसभेतील पदाधिकारी यांचे “शिवसेना पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर” कार्ला, लोणावळा येथे रविवार दि. २८ जुलै सकाळी ९ ते ३ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते मा. संजयजी राऊत साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, संपर्क नेते बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबूकस्वार,शिवसेना महिला संपर्क नेत्या लतिका पास्ते, वैशाली सुर्यवंशी, विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव, गिरीश सावंत, युवसेना विस्तारक वैभव थोरात,व संयोजन समितीचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा संघटिका शादन चौधरी शहर प्रमुख – योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, तालुका प्रमुख राजु खांडभोर, तालुका संघटिका शैला खंडागळे, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका सरीता साने, अनिता तुतारे, युवसेनेचे जितेंद्र ननावरे, अनिकेत घुले, विश्वजित बारणे, अभिजित गोफण, दीपाली भिलारे, शर्वरी जळमकर, प्रतिक्षा घुले, माजी सभापती शरद हुलावळे व भारत ठाकुर या सर्व प्रमुख पदाधिकार्यांनी शिबिराचे संयोजन केले आहे.
या शिबिरामध्ये विधानसभा २०१९ ते २०२२ पर्यंत होणार्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासाठी शिवसैनिकांनी सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नियोजनबद्ध संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार होण्यासाठी व आपला शिवसैनिक सक्षम शिवसैनिक हे व्हिजन ठेऊन कार्यकर्त्यांना दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराची सुरुवात सकाळी ९ ते १० या वेळेत शिवसैनिक आरोग्य तपासणी शिबिराने होणार आहे. नंतर १० वाजता शिवसेना नेते संजयजी राऊत यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून पहिल्या सत्रामध्ये शिवसेना उपनेते व व्याख्याते मा. नितिन बानगुडे पाटील यांचे संघटन हेच सामर्थ्य या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. दुसर्या सत्रामध्ये प्रा. पंकज महाराज गावडे यांचे चला बदलूया महाराष्ट्र घडवूया या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच शेवटच्या तिसर्या सत्रात शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांचे माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र अभियान व संघटनात्मक बांधणी संदर्भात शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. व दुपारी ३ वाजता समारोप होणार आहे. या शिबिरामध्ये पिंपरी-चिंचवड-मावळ विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थीसेना व शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.











