न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने पिंपरी वाघेरे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर आसनस्थ पुतळा बसविण्यात येणार असून त्या परिसराच्या विकासासाठी येणा-या सुमारे ७४ लख ८९ हजार रुपये खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २७ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
प्रभाग क्र. ११ मधील पूर्णानगर येथील से. क्र. १८ सी.डी.सी.मधील मोकळी जागा क्र. ४ पर्यटन केंद्राच्या धर्तीवर विकसित करणेकामी येणा-या सुमारे १४ कोटी ९६ लाख ८० हजार रूपये खर्चास यावेळी मंजुरी देण्यात आली. पवना धरणातून बंद पाईप लाईनमधून पाणी आणणेकामीच्या पाईप स्थलांतराकामी येणा-या सुमारे ८० लाख रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.४९ थेरगाव बापुजीबुवा नगर येथील सर्व्हे नं.९ मध्ये दवाखाना या इमारतीचे बांधकाम (२०० बेड साठी) चालु आहे. या इमारतीत उच्चदाब वीज पुरवठा करणेकामी येणा-या सुमारे ८४ लाख ६४ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२ चिखली मधील से.नं. १६ राजेशिवाजी नगर मध्ये फुटपाथ विकसित करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी १२ लाख ५३ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.६ धाडेवस्ती, भगतवस्ती, गुळवेवस्ती परिसरामध्ये स्टॉर्म वॉटर लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे ६२ लाख ५५ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१० सायन्स पार्क तारांगण (टप्पा २) येथे उर्वरित कामे करणेकामी येणा-या सुमारे २ कोटी २७ लाख ४२ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२ मधील बो-हाडेवाडी, खिरीडवस्ती, आहेरवाडी, आल्हाटवस्ती, विनायकनगर येथील रस्ते डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ८८ लाख ३० हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी लोकअदालतसारखा उपक्रम घेणा-या कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, नगरसचिव उल्हास जगताप व कायदा विभागाचे मुख्य लिपिक श्रीवास्तव तोडकर यांचा यावेळी सभापती विलास मडीगेरी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.











