न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत घरांचा सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा, या मागणीसाठी शास्तीविरोधी कृती समिती उद्या गुरुवार (दि. २५) रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे, अशी माहिती शहर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.
शहर मनसेच्या वतीनेही सभागृहामध्ये व सभागृहाबाहेरसुद्धा याबाबत आवाज उठविला आहे. वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरीकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलने उभी केली आहेत. तेव्हा सर्व शास्तीकर बाधित नागरिकांनीही ह्या मोर्चा मध्ये सामील व्हावे, असे आवाहन चिखले यांनी केले आहे.











