न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- स्वः राजीव गांधी प्रतिष्ठानचे वतीने महाराष्ट्र प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठानचे वतीने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम शिंदे यांच्या हस्ते थोरात यांना संभाजी महाराजांचा पुतळा भेट देऊन व काँग्रेस पक्षाची तिरंगा पट्टी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते जयराम शिंदे, संदेश नवले, दिपक थोरात, राजेंद्र लोंढे, आबा खराडे आदी उपस्थित होते.
जेष्ठ नेते जयराम शिंदे, संदेश नवले यांनी बाळासाहेब थोरात यांना विनंती केली की, आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाला गतवैभव सुवर्ण दिवस आणण्यासाठी लक्ष घालावे, तसेच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांना आळंदी, देहू, शिवनेरी व रायगड या सर्व तिर्थक्षेत्री दौरा करावा. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवारांना होऊ शकतो. पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना व महिला कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.











