न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी महापौर योगेशभाई बहाल यांच्या वाढदिनानिमित्त पिंपरी येथील लांडेवाडी वसाहत परिसरात मोफत आरोग्य चिकित्सा, तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील ५६८ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, व लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता.
पिंपरी परिसरातील अनेक वसाहतीमध्ये सर्वसामान्य कष्टकरी नोकरदार कुटुंबे वास्तव्य करतात, अनेकदा शारीरिक समस्या व व्याधी असूनही महागड्या उपचारांमुळे उपचार घेणे त्यांना शक्य होत नाही, अशा नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी अजितदादा पवार आणि योगेशभाई बहल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध आजारांबाबत मोफत आरोग्य तपासणी, चिकित्सा व मोफत उपचार हा उपक्रम राबवला.
आयोजित आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह तपासणी, स्थूलता तपासणी, हृदयरोग तपासणी (ई. सी. जी.),नेत्र तपासणी, त्वचेचे विकार, कान, नाक, घसा संबंधी तपासणी आदी तपासण्या करण्यात आले. शिवाय ज्या नागरिकांना उपचाराची गरज आहे अशा नागरिकांवर पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियाही या ठिकाणी मोफत करण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी संगीतले कि, “आजारांबाबत दुर्लक्ष्य न करता त्यांच्यावर योग्य उपचार करणे गरजचे आहे, महागड्या उपचारांमुळे अनेकांना ते शक्य होत नाही अशा नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी आणि त्यांना सर्व आजारांवर मोफत उपचार मिळावेत यासाठी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून येत्या काळात शहरभरातील विविध वसाहतींमध्ये अशी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत” आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी आमदार विलास लांडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती स्मिता कुलकर्णी, माजी शिक्षण मंडळ उपसभापती मायला खत्री आदी मान्यवर उपस्थित होते.











