न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून बेपत्ता झालेली एका अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. हा बलात्कार तिच्या सख्ख्या चुलत्यानेच केला असल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलिसांनी नराधम चुलत्याला अटक केली आहे.
मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी तिचा शोध सुरु केला. दोन तास म्हणजेच पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा तिच्या आई वडिलांनी शोध घेतला. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले. सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि या मुलीचे आई-वडील मुलीचा शोध घेत होते.अखेरीस मिलिट्री कॅम्पची भिंतीलगत असलेल्या कंपाउंडच्या आत पाण्याच्या खड्ड्यात या मुलीचा मृतदेह पहटेच्या सुमारास सापडला होता.











