न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- पिंपरी, भाटनगर येथील बिस्कीट व चॉकलेटच्या तीन मजली इमारतीमध्ये असलेल्या गोडावूनला आज शनिवार (दि. २७) रोजी सकाळी साडे आठच्या सुमारासभीषण आग लागली. या आगीत गोडावून खाक झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. संत तुकारामनगर येथील अग्निशाकमक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.















