न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २७ जुलै २०१९) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे ५ येथे तीन दिवसीय नाट्य शिबिराला सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी एसएससी बोर्ड पुणे सहसचिव डॉ. भाऊसाहेब कारेकर म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले पाहिजे. तरच कलाकार मिळतील आणि समाजाचे मनोरंजन करण्याचं काम करतील नाटक, सिनेमा,मालिका आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडत नाही. म्हणून कलाक्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे.
विद्यार्थी हा शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित करत असतात. कलाकार आपल्या कलेतून व भूमिकेतून इतरांचे मनोरंजन करत असतो. यासाठी कलाकारांची गरज आहे. यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी नाट्य कलाकार प्रसाद भडसावळे, निखिल राऊत, सुयश टिळक, योगेश फुलपगर, संदीप अवचट हे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सांगिता लकारे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यास वाव मिळावा म्हणून नाट्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच नाट्यकला म्हणजे ईश्वराच्या कर्तुत्वशक्तीचा एक उत्तम आविष्कार होय.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष व संस्थेचे उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे म्हणाले की, या शाळेने अनेक विद्यार्थी घडवून वेगवेगळ्या क्षेत्रात पाठवले आहेत.
कलाकार आशुतोष कुलकर्णी म्हणाला की, मी फार भाग्यवान समजतो की मी मॉडर्न शाळेचा विद्यार्थी आहे. या मॉडर्नमुळे मी घडलो, असून मला आजही शाळेची आठवण येते.
व्यासपीठावर उपस्थित शाळेचे व्हिजिटर उद्धव खरे, संस्थेचे नियामक मंडळ सदस्य प्रमोद शिंदे, शिक्षण उपनिरीक्षक पुणे विराज खराटे, उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण, प्रशालेच्या माजी शिक्षिका गीतांजली राव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाभाऊ शिनलकर, खंडू खेडकर, मुग्धा कुलकर्णी, करुणा कामथे, तृप्ती चांदोरकर, प्रशांत बुधिहाळ, प्रदीप शिंदे, वृषाली सलगर यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व सहकार्यवाह, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश निबेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्मिता पवार यांनी केला.कार्यक्रमाचे आभार शारदा साके यांनी मानले.


















