न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- फिर्यादी मनोज कुमार गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता मोटारीने सहकारी नमिता जैन यांना त्यांच्या घरी सोडण्यास जात होते.
इन्फोसिस सर्कल येथे त्यांच्या मोटारीला एका रिक्षाने जोरदार धडक दिली. रिक्षातील दोघांनी खाली उतरून मनोजकुमार यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याची १ लाख ४१ हजार रूपयांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.
मनोज कुमार (वय ४७, रा. लाईप रिपब्लिक कोलते-पाटील, मारूंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षातील अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.


















