न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- फिर्यादी बर्नवाल यांना १४ मे रोजी ८०१६४३१४७७ या मोबाईल धारकाने फोन केला. मी बँकेचा कर्मचारी असून तुमचे डेबिट कार्ड सुरू करून देतो, असे खोटे सांगितले. त्याच्या खात्यातून १ लाख ८ हजार ४७६ रूपये आरोपीने स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून बर्नवाल यांची फसवणूक केली.
रूपेशकुमार श्रीबिरंचीप्रसाद बर्नवाल (वय ३६, रा. इन्कमटॅक्स कॉलनी, कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चिखली पोलीस तपास करत आहेत.















