न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरहून नुकतेच पिंपरीत आगमन झाले. या परतीच्या पालखीचे विठू भक्तांनी पिंपरीत उत्साहात स्वागत केले. या वेळी वारकर्यांना अल्पोपहार, फळवाटप करण्यात आले.
पिंपरी येथे दुपारी सव्वाचार वाजता पिंपरीत पंढरपूरहून पालखीचे आगमन झाले. या वेळी पालखी सोहळा प्रमुख व दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. स्वागत सोहळ्याला संजोग वाघेरे, नगरसेविका उषा वाघेरे आदी उपस्थित होते. पाऊणतास पालखीने पिंपरीत विसावा घेतला.















