न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०१९) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरेवस्ती येथील ज्ञानदा प्राथमिक विद्या मंदिर व राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
ज्ञानदा शाळेच्या मुख्याध्यापिका नीता करपे, मोनिका सुतार, शितल शिंदे, दैवशाला चोले, संगीता शिंदे, दिपक जरे तसेच शरदनगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे सचिव लहू कांबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे व सहकारी शिक्षक विकास म्हस्के, संदीप बोर्गे, उमेश माने, मिलिंद चोरगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला.
शिवसेना समन्वयक सर्जेराव भोसले, अनिल सोमवंशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपनेते, माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना समन्वयक सर्जेराव भोसले, विभागप्रमुख सतीश देसले, चंद्रकांत जाधव, आनंद हिंगे, घन:शाम सूर्यवंशी, हरिभाऊ लोहकरे, संजय गाढवे, सुखदेव देवकर,चंदू जाधव यांनी केले.















