न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०१९) :- नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांच्या वतीने सोमवार (दि. २९) जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवडमधील श्रीधरनगर येथील घारे शास्त्री सभागृह येथे दहावी व बारावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या समारंभात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग व पाणी बचत’ या विषयावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे व्याख्यान सादर करणार आहेत. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, भाजपा सचिव महाराष्ट्र प्रदेश उमा खापरे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रभाग क्र. १९ मधील शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी केले आहे.















