न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०१९) :- मोशीत एका व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ईश्वर सोमनाथ बदनाळे (वय ४२ राजू रस्ते, शिवाजी वाडी, मोशी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
याप्रकरणी सुजित दत्तात्रय सस्ते (वय ४१, रा. शिवाजी वाडी, मोशी, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी-आळंदी रस्त्यावर श्रीनाथ कंट्रक्शन येथे एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता हा मृतदेह ईश्वर सोमनाथ बदनाळे या व्यक्तीचा असल्याचे चौकशीत समोर आले. बदनाळे यांचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोशी – आळंदी रस्त्यावरील श्रीनाथ कंट्रक्शन साइटवर आणून टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बदनाळे यांचा खून कोणी व कुठल्या कारणांनी केला याचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदेेे करीत आहेत.















