न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- शिवसेना पक्षप्रमुख लोकनेते सर्वसामान्य जनतेचे कैवारी उध्दवजी ठाकरे यांची ‘मातोश्री’ वर शिवशाही व्यापारी संघ संस्थापक, अध्यक्ष युवराज दाखले यांनी पदाधिकाऱ्यासोबत भेट घेऊन स्वामी समर्थ व शंकर महाराज यांची फोटो फ्रेम व अभय देशपांडे लिखित दिव्यस्पर्शी हे पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख निलेशदादा धुमाळ, शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, मुंबई प्रदेश अध्यक्ष योगेश घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील, प्रकाश निकाळजे, गणेश जाधव, राहुल शिंपी, विशाल धुमाळ, चेंबुर विधानसभा महिला अघाडी अध्यक्षा प्रार्थनाताई कानडे-मिटना आदी उपस्थित होते.
शिवशाही व्यापारीसंघ लातुर जिल्ह्याच्या वतीने व चेंबुर विधानसभेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप महादेव काळे व गजानन यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पुणे शहराच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार महिला प्रदेश कार्याध्यक्षा सुनिताताई खंडाळकर यांनी केला. तसेच शिवशाही बँन्ड कलाकार आघाडीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. दिनकर गांदले, नितीन येडके यांनी रक्तदान केले. यावेळी दत्ता गिरी, रविकिरण घटकार उपस्थित होते. गोंदीया जिल्हाध्यक्ष लोकचंद भिसेन यांनी रूग्णालयात रुग्णांना फळवाटाप केले, अशी माहिती शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिली.












