न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती पुण्यातील निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात रविवारी (दि. २८) रोजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विद्या चव्हाण, पार्थ पवार यांनी घेतल्या.
विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांनी पक्षाकडे रितसर अर्ज दिला आहे, त्यांच्या मुलाखती यावेळी झाल्या. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिनही विधानसभा मतदारसंघातील एकूण २० इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात विशेष म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मात्र, या मुलाखतींना गैरहजेरी लावली. त्यामुळे याबाबत कुजबुज सुरु होती.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ८ :- राजेंद्र गणपत जगताप, विशाल शंकर वाकडकर, भाऊसाहेब रामभाऊ भोईर, मोरेश्वर महादू भोंडवे, मयुर पांडुरंग कलाटे, विठ्ठल (नाना) कृष्णाजी काटे, प्रशांत कृष्णराव शितोळे, सतिश दगडू दरेकर यांचा समावेश आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून ८ :- अॅड. गोरक्ष जाकाराम लोखंडे, सुलक्षणा शिलवंत-धर, राजू विश्वनाथ बनसोडे, संदीपान रामा झोंबाडे, शेखर अशोक ओव्हाळ, सुनंदा सतिश काटे, आण्णा दादू बनसोडे, काळूराम मारूती पवार यांनी मुलाखत दिल्या.
भोसरी विधानसभा मतदारसंघातून केवळ चार जणांनी स्वारस्य दाखवले. माजी आमदार विलास विठोबा लांडे, शांताराम दगडू भालेकर, दत्तात्रय कोंडीबा जगताप, पंडित रामभाऊ गावळी.












