न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवडमध्ये आईने तीन मुलांना गळफास देऊन स्वतः आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना रविवारी घडली होती. मात्र, आता या घटनेने वेगळे वळण घेतले असून या घटनेतील मृत दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब शवविच्छेदन अहवालात समोर आली आहे.
याप्रकरणी एका नातेवाईकास भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मृत आईवर संशयावरून खुनाचा गुन्हा भोसरी पोलिसांनी दाखल केला असल्याची माहिती राम जाधव (सहायक पोलीस आयुक्त) यांनी दिली आहे.












