न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे आज पार पडली.
यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, प्रदेश चिटणीस उमा खापरे, रवी अनासपुरे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.
यावेळी सहकार मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे भाजप प्रभारी सुभाष देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आपले चांगले संबंध असल्याचा अपप्रचार करण्यात बारामतीकर तरबेज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार निवडून यावेत असे वाटेल का? शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुक्त करण्याचे ‘घोषवाक्य’ करा, असे देशमुख यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.















