न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०१९) :- सर्वच राष्ट्रीय पक्ष व राज्य स्तरावरील लहान मोठ्या पक्षांनी आपआपल्या कार्येकत्यांकडून ३५० ते ४०० उमेदवारी अर्ज भरुन द्यावेत. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत त्या कार्येकत्यास उमेदवारास सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करावा. सदरचे अर्ज भरो आंदोलन जर यशस्वी केले तर EVM आपोआप रद्द होईल व इतर राज्यांमध्ये सदरचे आंदोलन केले जाईल व संपुर्ण देशातुन EVM हद्द पार होवून लोकशाही सक्षम व मजबुत होईल. त्यासाठी राज्यभरात आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर “EVM विरुध्द उमेदवारी अर्ज भरो आंदोलन” करून त्यास आपण सर्वोतपरी मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मा. खासदार राजु शेट्टी व बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ”सन २०१४ मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतातील प्रत्येक विधानसभा निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका भाजपा मोठ्या मत्ताधिक्याने जिंकू लागला. मात्र सदर निवडणुकाचे निकाल पाहता तो जनादेश नसून मोठ्या प्रमाणात EVM मध्ये गडबड घोटाळा केला जात असल्याचा संशय फक्त पराभूत उमेदवार नव्हे तर जनतेलाही येऊ लागला आहे.
ब-यासच्या महापालिकेच्या निवडणूकीमध्ये झालेले मतदान व मोजलेले मतदान यामध्ये फरक आढळून आला आहे. ब-याच ठिकाणी उमेदवारांना त्यांच्या परिसरात अपेक्षा पेक्षा बरीच कमी मते मिळाले असल्याचेही सिध्द झाले आहे व त्याविरुद्ध ब-याच पराभूत उमेदवारांनी न्यायलयात याचिका दाखल केल्या आहेत. EVM विरुध्द आंदोलनही झाली आहेत. सन २०१९ चे लोकसभेचे निकाल हे बहुतांशी संशयास्पद आहेत. त्या विरुध्द ब-याच सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत. ठिक-ठिकाणी लोकांमध्ये जाऊन EVM बाबत काही तज्ञ लोक माहिती देत आहे. त्यामध्ये सामाजिक कार्येकर्ते, विधी तज्ञ, संगणक तज्ञ, इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे. तसेच EVM विरुध्द ब-याच याचिका सुप्रिय कोर्टात सुरु आहे.
लोकसभा निवडणुक सन २०१९ च्या निकालानंतर देशातील ५४३ लोकसभा मतदार संघापैकी ३०० पेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात EVM मशीनमध्ये झालेले मतदान व मतमोजणीमध्ये मोजणी करण्यात मतांमध्ये मोठी तफावत दिसली. यात ५० लाखपेक्षा अधिक मतदान मिळून आले नाही. त्यामुळे ही मतदानाची चोरीच असून हा गैरव्यवहार व भ्रष्टाचारच आहे. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर २० हजार EVM मशीन गहाळ झाल्याचे माहिती अधिकारातुन स्पष्ट झाले आहे. सन २०१९ ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर EVM मशीन कचरा कुंडयात, टँपोत, ट्रकमध्ये आढळल्या त्याचे वेगवेगळया वृत्तवाहिण्यांनी थेट प्रेक्षपण केले. त्याचे दर्शन संपूर्ण देशाला झाले आहे, असेही भापकर म्हणाले.
वरील सर्व बाबींचा विचार करीता माझे असे म्हणणे आहे की, EVM हटविण्यासाठी आपण न्यायालीन लढाई, आंदोलने, लोक जनजागृती हया बरोबरच “आगामी विधानसभा निवडणुकीत अर्ज भरो” आंदोलने करणे आवश्यक आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघानुसार अर्ज भरो आंदोलनानुसार आपण जर प्रत्येक विधानसभेमध्ये किमान ३५० ते ४०० उमेदवाराशी अर्ज विविध आपल्या कार्येकत्यामार्फत भरुन घेण्याची व्यवस्था केली. तर निवडणूक आयोगास सदर मतदार संघात EVM वापरणे शक्य होणार नाही. कारण माझे माहितीनुसार M1 व M2 EVM मशीन वापरल्या जात होत्या. तेव्हा त्या मतदारसंघात ६४ पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवित असल्यास EVM वर मतदान घेणे निवडणुकी आयोगाला शक्य होत नव्हते. त्या ठिकाणी मतपत्रिका वापरण्याचा नियम होता. मात्र आता निवडणूक आयोग याला पर्याय म्हणून M3 मशीन वापरत असून आता ३४६ उमेदवार असतील तरी EVM मशीनव्दारे मतदान होते. मात्र आगामी विधानसभा निवडणूकीत सर्व राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पक्षांनी प्रत्येक विधानसभा निहाय ३५० ते ४०० उमेदवारी अर्ज भरो मोहिम राबवली. तर निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागेल.
त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येऊन भारतातील लोकशाही मजबूत होवुन. निवडणुक प्रक्रियेवर निर्माण झालेला अविश्वास दुर होऊन निवडणुक आयोगाची गेलेली विश्वासर्हता व पत पुन्हा प्राप्त होईल. त्यामुळे आपल्यासह सर्वच राष्ट्रीय पक्ष व राज्य स्तरावरील लहान मोठ्या पक्षांनी आपआपल्या कार्येकत्यांकडून ३५० ते ४०० उमेदवारी अर्ज भरुन द्यावेत. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत त्या कार्येकत्यास उमेदवारास सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करावा. सदरचे अर्ज भरो आंदोलन जर यशस्वी केले तर EVM आपोआप रद्द होईल व इतर राज्यांमध्ये सदरचे आंदोलन केले जाईल व संपुर्ण देशातुन EVM हद्द पार होवून लोकशाही सक्षम व मजबुत होईल. तरी आपणांस नम्र विनंती आहे की, माझ्या वरील सुचनेचा विचार करावा व तशी प्रक्रिया आपापल्या पक्ष्याच्या माध्यमातून राबवावी यासाठी आपण पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत, असे भापकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.















