न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने उन्नाव प्रकरणाबाबत पिंपरी चौक येथे निषेध सभा घेण्यात आली. या वेळी उत्तरप्रदेश येथील उन्नावच्या पिडीत युवती वरील आजवर झालेल्या अन्यायकारक घटनांचा निषेध करण्यात आला व भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर व ईतर आरोपींवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
“संपूर्ण भारतभर सध्या चर्चेत असलेले उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील बलात्कार व खुन प्रकरण अमानवीय व विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे, जनतेनध्ये चीड व संतापाचे वातावरण आहे, अत्याचारासाठी सत्तेचा गैरवापर हे भाजपा राजवटीचे सुत्र आहे व हे वारंवार दिसून आले आहे. याबाबत भाजपा वरिष्ठ नेत्यांनी व पंतप्रधान मोदींनी बाळगलेले मौन हे भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्या या कृत्याला मुक संमती दिल्याचेच प्रतिक आहे व यातून भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. आता सहनशिलतेचा अंत झाल्याने जनता भाजपाला घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही” असे मत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी निषेध करताना व्यक्त केले.
याप्रसंगी प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव व पिंपरी चिचंवड युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रिया पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, अल्पसंख्यांक विभागाचे सचिव राजन नायर, प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, एन एस यू आय चे माजी अध्यक्ष सचिन कोंढरे, अशोक काळभोर, उमेश बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस गौरव चौधरी, सिध्दार्थ वानखेडे, नियाज शेख, फारूख खान, विशाल कसबे आदि पदाधिकारी व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सचिन कोंढरे, अशोक काळभोर, नरेंद्र बनसोडे, प्रिया पवार, अशोक मोरे यांनी निषेध व्यक्त केला.


















