न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार श्री. पै महेशदादा लांडगे युवा मंचच्या वतीने कुदळवाडी येथे आज गुरुवार (दि. १ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र शासन कामगार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपा कामगार आघाडी प्रदेश सचिव हनुमंत लांडगे, स्वी. नगरसेवक दिनेश यादव व परिसरातील कामगारवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. या योजनेचा शुभारंभ भाजपा कामगार आघाडी प्रदेश सचिव हनुमंत लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनाच्या विविध सवलतींसाठी या मोहिमेत कामगारांना नोंदणी करणे बंधनकारक असून, आधारकार्ड, पँनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, तीन फोटो, रेशनकार्ड आदी आवश्यक कागदपत्रे घेऊन नोंदणीसाठी कुदळवाडीतील विठ्ठल मंदिराशेजारी, शिवसाई पतसंस्था येथे अथवा ९८८१२४५५७२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक स्वी. नगरसेवक दिनेश लालचंद यादव यांनी केले आहे.















