न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मिडीअम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने शाळेच्या प्रांगणात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रशेठ तापकीर ( मा. विरोधी पक्षनेते पिं. चिं. मनपा) यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजूशेठ पवार (जेष्ठ संचालक- शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ) हे होते.
यावेळी अनिताताई तापकीर (मा. नगरसेविका पिंचिंमनपा), सागरशेठ तापकीर, शेळके मामा (सामाजिक कार्यकर्ते), मुख्याध्यापक शशिकांत वाखारे सर हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे व पोवाडे सादर केले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन बापू बल्लाळ सर यांनी केले. तर देव सर यांनी आभार मानले.















