न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, तेजल कोळसे पाटील आदी उपस्थित होते.
इयत्ता पहिलीतील शामली सावंत या विद्यार्थिनीने ‘ हे राष्ट्र देवतांचे’ या गीतामधून लोकमान्य टिळक यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. प्रज्ज्वल तिखे आणि हिमांशू चौधरी या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांची वेशभूषा करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी लोकमान्य टिळकांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. इयत्ता तिसरीतील श्रेया करपे आणि इयत्ता सहावीतील अवि राठोड या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माहिती दिली.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या वाक्याने कार्यक्रमाची सांगता शिक्षिका मोनिका रामास्वामी आणि श्रुती तावरे यांनी केली.















