न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- निगडी येथील लोकमान्य टिळक यांचा पुतळा पूर्णाकृती उभारण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भास्कर जामदार काका, सदाशिव कोकाटे, वसंत काटकर, रोहित काळभोर यांनीही ही मागणी लावून धरली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे की, निगडीमधील लोकमान्य टिळक चौकामध्ये लोकमान्य टिळक यांचा अर्धाकृती पुतळा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्म २३ जुलै १८५६ ते १ ऑगस्ट १९२० थोर भारतीय नेते आधुनिक भाष्यकार व प्राच्याविधा पंडीत. डेक्कन कॉलेज मध्येच लोकमान्य टिळक यांनी देशकार्याला वाहुन घेण्याचा संकल्प केला. पुढे मरे पर्यंत देशासाठी लढले.
अशा थोर महापुरुषाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. शहरातील बरेच काही पुतळे आपण पूर्णाकृती केले आहेत. त्यामुळे निगडीमधील टिळक पुतळा हा पूर्णाकृती उभारण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेना वेळोवेळी पाठपुराव करत आहे. याची आपण घ्यावी, असे चिखले यांनी या निवेदनात म्हटले आहे.















