न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर प्रवेशद्वाराजवळ कमानीची उभारणी करण्यात आली आहे. या कमानीचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक शैलेशभाऊ मोरे, शितल शिंदे, हरिदास सर यांच्या हस्ते गुरुवार (दि. १) रोजी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक शैलेशभाऊ मोरे, शितल शिंदे, हरिदास सर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, काळूराम पवार, आनंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

याप्रसंगी नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, आनंदनगरच्या रहिवाश्यांची बऱ्याच दिवसांपासून कमान उभारणीची मागणी होत होती. त्यासाठी पाठपुरावा सुरु होता. आज कमानीचा प्रश्न मार्गी लागला. या प्रवेशद्वाराचे ”आण्णा भाऊ साठे प्रवेशद्वार” असे नामकरण करण्यात आले आहे. आण्णा भाऊंच्या विचारांचा वैचारिक वारसा यानिमित्त्याने लोकांना आठवण करून देत राहील.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक शितल शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.












