न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड व आसपासच्या परिसरातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती नागरिक व पर्यटक यांना होणेचे उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वतीने पिंपरी चिंचवड दर्शन बस सुविधा देण्यात येणार आहे. सदर पिंपरी चिंचवड दर्शनबस सेवेचा उद्घाटन समारंभ रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांचे शुभहस्ते आज शनिवार दि. ३ /०८ / २०१९ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बस टर्मिनस, भक्ती शक्ती चौक निगडी या ठिकाणी संपन्न झाला.
याप्रसंगी राहुल जाधव, संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ लि तथा महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, विलास मडिगेरी संचालक पणे महानगर परिवहन महामंडळ लि तथा अध्यक्ष स्थायी समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रियंका बारसे नगरसेविका पिंपरी चिचवड महानगरपालिका, अमित गोरखे, अध्यक्ष आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकिय संचालक परिवहन महामंडळ, महामंडळाकडील अधिकारी, कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पिंपरी चिंचवड दर्शन बससेवे अंतर्गत निगडी येथून देहूगाव येथून आळंदीसाठी दर्शन सेवा उपलध होणार असून यासाठी प्रति प्रवाशी तिकीट दर ८००/- आकारण्यात येणार आहे. सदरचे दर्शन बससेवेचा कालावधी सकाळी ९ ते १ असा आहे. याकरिता निगडी व भोसरी येथील पास केंद्रावर तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे.















