न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या पात्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढ होत असून नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
गेल्या काहीदिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यांतील पवना धरण 100% भरल्याने धरणातून 5600 क्युसेस पाणी सोडण्यात आले. मुळा व इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. पवना धरणातून विसर्ग सुरू आहे. येत्या काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाबरोबरच आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. संभाव्य पूराचा धोका लक्षात घेता नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.















