न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- पावसामुळे शहरात सर्वत्र रस्त्यावर खडडे पडलेले आहे. तसेच मेट्रो कामकाजामुळे वाहतुकीचा ताण शेजारील सेवा रस्त्यावर येत आहे. पावसामुळे सदरचे सेवा रस्ते खराब झाले असून खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरीकांना येताना जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ब-याच ठिकाणी दुतर्फा वाहनांच्या लाईनी लागून वाहतुक कोंडी होत आहे.
पावसामुळे रस्त्यावरील पडलेले खड्यांमुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शहरातील बहुतांशी स्पीडब्रेकरजवळ पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला चर नसलेने स्पीड ब्रेकरजवळ पावसाचे पाणी साठलेले दिसून येत आहे. स्पीड ब्रेकर जवळ पावसाची पाणी वाहून जाण्यासाठी तातडीने वाट करुन द्यावी. तरी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खडडयांचा सर्व्हे करुन सर्व खडडे दोन दिवसात भरुन घेण्यात यावेत व शहरातील नागरिकांसाठी खडडे मुक्त अभियान राबविण्यात यावे, असे स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















