न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगर परिवहन महामंडळ लि यांच्यावतीने पिंपरी चिंचवड व आसपासच्या परिसरातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती शहरातील नागरिकांना व पर्यटकांना व्हावी या उद्देशाने पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा आज सुरु करण्यात आली आहे. परंतु, सदरच्या बससेवेचे तिकीट दर जास्त असल्यामुळे ही बस सेवा व्यवहार्य ठरणार नाही, असे परखड मत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेचे प्रत्येकी ८०० तिकीट ठेवले आहे. परंतु या बससेवेसाठी असणाऱ्या बसेस जीर्ण झालेल्या असून पूर्वी त्या हिंजवडी ते पुणे विमानतळ या सेवेसाठी कार्यरत होत्या ती सेवा बंद पडल्यामुळे या बसेस पिंपरी-चिंचवडसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा पीएमपीएमएल पिंपरी चिंचवड शहरासाठी दुजाभाव दाखवून दिला आहे. त्यासाठी ४० रुपये तर सर्वसामान्य साठी ७० रुपये आहे त्यामुळे पाचशे रुपये खर्च करून किती नागरिक या सेवेचा लाभ घेतील याबाबत सांशकताच आहे.
यापेक्षा खाजगी सेवा स्वस्तात घेता येते. त्यामुळे याबस सेवेचे दर किफायतशीर ठेवणे गरजेचे आहे. मोठा गाजावाजा करून पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा करून शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेता नाना काटे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व महिला अध्यक्ष वैशाली काळभोर उपस्थित होते.















