न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश काढून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कमी करण्याचे ठरविले आहे. त्या विषयाला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे सायंकाळी ०५:०० वा. निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, महिला अध्यक्षा सौ. वैशाली काळभोर यांनी आपल्या भाषणांमध्ये सरकारने हा निणर्य मागे घ्यावा व जसे मागच्या २० ते २५ वर्षापासून आरक्षण प्रक्रीया आहे. तशी राबवावी असे ठरविण्यात यावे.
राज्यामध्ये संख्येने ५२% असणाऱ्या ओबीसीनी येत्या विधानसभा निवडणूकीत विचारपूर्वक विचार करून पुढील काळात आपले राजकीय शैक्षणिक, व्यावसायिक आरक्षण टिकवायचे असेल तर या नाकर्त्या सरकारला धडा शिवण्याशिवाय स्वस्त बसू नये. त्यांना घरचा रस्ता दाखवावा, असे खडे बोल ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे यांनी सुनावले.
या आंदोलनास नगरसेविका संगीता ताम्हाणे, अनुराधा गोफणे, नगरसेवक राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, कविता खराडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, सचिन औटी, अरुणा, कुंभार, शैलेश बासुतकर, बाळासाहेब पिल्लेवार, आनंदा यादव, उत्तम आल्हाट, मनोज सुतार, सतिष दरेकर, यतिन पारेख, आनंदा कुदळे, ईश्वर कुदळे, नाना धेंडे, सविता धुमाळ, हमीद शेख, बाळासाहेब जगताप, दत्तात्रय जगताप, चंद्रकांत जाधव, सुनिल भुमकर, संतोष दाढगे, चंद्रशेखर भुजबळ, देविदास गोफणे, प्रकाश आल्हाट, वसंत आल्हाट, विशाल जाधव, सतिश चोरमले, पोपट पडवळ, भरत भोसले इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.















