न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीची आज आचारसंहिता लागू झाली. यानंतर आचारसंहितेची तत्काळ अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी केल्याचे दिसून आले.
आचारसंहिता जाहीर झाल्याचे समजल्यानंतर महापौर जाधव यांनी महापालिकेत स्वतः येऊन आपले सरकारी वाहन महापालिकेत जमा केले. त्यानंतर ते स्वतः ऑटोरिक्षा चालवत आपल्या घरी गेले.












