राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड व भोसरी मतदारसंघातील इच्छुकांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, या तीनही मतदारसंघातील आढावा घेतला. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली बैठक सुमारे पाच तास चालली.
या बैठकीत अजित पवार यांनी इच्छुक उमेदवाराशी वैयक्तिक संवाद साधत मतदारसंघातील सद्य स्थितीबाबत चर्चा केली. तसेच, त्यांची मते जाणून घेतली. पदाधिकाऱ्यांनी तिन्ही मतदारसंघात निवडणूक लढविण्याची यावेळी मागणी केली.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ आदी उपस्थित होते.












