विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फुटणार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा रविवारी (दि. २१) रोजी मेळावा होणार आहे. काळेवाडी येथील बालाजी मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता हा मेळावा आयोजित केला जाणार आहे.
या मेळाव्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यातच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.
या मेळाव्यास शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार अण्णा बनसोडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, राजेंद्र जगताप, पंडीत गवळी, पक्षाचे प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित राहणार आहेत.












