न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड मधील विठ्ठलनगर येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून करण्यात आला आहे. श्याम किसन खंडागळे (वय २८ रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी करण रमेश धूरंदरे (वय २२ रा. जय हनुमान सोसायटी, विठ्ठलनगर, नेहरुनगर) यांनी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.












