न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०१९) :- कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन व अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवार (दि.२०) रोजी जाहीर केला. कॉर्पोरेट कराचा विद्यमान दर ३०% होता व सेस-सरचार्ज मिळून तो ३४.९४ % पर्यंत भरावा लागत होता. आता तो २५.१७ % झालेला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्र दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, १ एप्रिल २०१९ पासून नवा निर्णय लागू होईल. नव्या कर कपातीमुळे कंपनीची वर्षाला १.४५ लाख कोटी रु. बचत होणार आहे. ही रक्कम कंपनी गुंतवणूक व उत्पादनावर खर्च करतील. जेणेकरून त्याचा उपयोग रोजगार संधी वाढण्यावर होईल व याचा एकूण फायदा बाजाराला होईल. या निर्णयामुळे कंपन्यांची देणी जवळपास १०% ने कमी होतील. कंपन्यांनी अन्य कुठलीही सवलत घेतली नसेल तर त्यांना फक्त २२ % कर द्यावा लागेल. अंतिम मुदती नंतर कमीकर दराचा प्रर्याय या कंपन्या निवडू शकतील.
नव्या कंपन्यांना १५ % कर १ ऑक्टो. पासून अस्तित्वात येणाऱ्या उत्पादक कंपन्यांना कराचा दर १५ % असतील. सरचार्ज व सेससह त्यांना १७.१ % कर भरावा लागेल. या कंपन्यांना अन्य insentiv मिळणार नाही. नव्या कंपन्यांना याआधी २५% कराचा दर होता. सरचार्ज व सेस सह तो २९.१२ % पर्यंत जात होता. नव्या कंपन्यांना १२ % सवलत नव्या निर्णयामुळे मिळाली आहे.
कर सवलती मुळे मेक इन इंडिया योजनेला मोठी चालना मिळेल. तसेच गुंतवणूक, रोजगार आणि आर्थिक उलाढाल वाढेल. तसेच नोकरकपात टळेल. खर्च कपात टळेल. खासगी क्षेत्रात नोकरीच्या नव्या संधी निर्माण होतील. उत्पादकता वाढेल. कर बचतीमुळे शिलकी पडलेला पैसा कंपन्यां उत्पादनात, गुंतवणुकीत, कर्जफेडीत वापरतील बँकिंग व्यवस्था आणि बाजारात रोकड वाढेल. त्यामुळे सरकारचा महसूलसुद्द्धा वाढेल, असे या प्रसिद्धीपत्रकात बेलसरे यांनी म्हटले आहे.












