न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०१९) :- भाजपची संघटनात्मक बांधणी चांगल्या प्रकारे झालेली आहे. देशभरात मागील वेळेस दहा कोटी भाजपचे सदस्य होते. यंदा नवीन नोंदणीत ७ कोटी सदस्यांची भर पडली. त्यामुळे देशात भाजपचे १७ कोटी सदस्य आहेत. पिंपरी चिंचवड शहरातही सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तसेच शहरात नवीन मतदार नोंदणीत ४५ हजार नवीन मतदारांची संख्या वाढली आहे. तसेच शहरातील तब्बल ३० ते ३५ हजार दुबार नावे कमी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीश बापट म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने पिंपरीत आज मंगळवार (दि. २४) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. लक्ष्मण जगताप. आ. महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे सचिन पटवर्धन, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मा. महापौर नितीन काळजे व आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बापट म्हणाले की, भाजपची पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातील संघटन बांधणी, व्युव्हरचना, निवडणूक आखणी, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात केंद्र सरकारच्या तसेच राज्याच्या वतीने जनहिताचे तसेच प्रलंबित प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. शहरात १०० टक्के कामे पूर्ण केल्याचा दावा आम्ही करीत नाहीत मात्र, बरीच कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. ती पुढील काळात मार्गी लावली जातील.















