न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०१९) :- शहर भाजपच्या वतीनं आज मंगळवार (दि. २४) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री व खासदार गिरीश बापट बोलत होते. पत्रकारांनी प्रलंबित पवना बंदिस्त जलवाहिनीच्या कामासंदर्भात प्रश्न विचारला असता बापट म्हणाले की, हे जुने प्रकरण आहे. सोडवताना दमछाक होते. आघाडी सरकारने हा प्रश्न प्रलंबित ठेवल आहे. मावळातील शेतकरी गोळीबार प्रश्न गाजला. शहरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याबाबत शेतकऱ्यांशी बैठक सुरु आहेत. जागेच्या मोबदल्यापोटी आर्थिक स्वरुपात काही शेतकऱ्यांमध्ये एकमत होत आहे. तसेच उर्वरित अडचणीही सोडवत पुढे चाललो आहोत. शेतकऱ्यांची सहमती घेऊनच पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल
सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्या आंदोलनाबाबत छेडले असता बापट यांनी महापालिका प्रशासन कमी पडले. लोकांचे काम असल्यामुळे आंदोलन करण्यास हरकत नाही. ते आंदोलन नसून प्रशासनाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे. प्रशासकीय अडचणींवर मत करून प्रभागातील विविध समस्या मार्गी लावू.
पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता त्यांचा या बैठकीशी संबंध नाही. ते मार्गदर्शन करा म्हणतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही पत्रकार परिषद सुरु आहे, असे सांगितले.
पीएमआरडीए कार्यालय विस्ताराबाबत विचारले असता बापट म्हणाले की, पीएमआरडीएचा कार्यविस्तार मोठा असल्यामुळे समाविष्ट भागातील लोकांना येथे येणे परवडत नव्हते. पीएमआरडीएची भविष्यात स्वतंत्र मध्यवर्ती कार्यालयाची उभारणी करणार आहोत. महापालिकेतील कारभारावर प्रश्न उपस्थित केले असता बापट यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
याप्रसंगी आ. लक्ष्मण जगताप. आ. महेश लांडगे, राज्य लोकलेखा समितीचे सचिन पटवर्धन, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मा. महापौर नितीन काळजे व आदी उपस्थित होते.















