न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात आकुर्डी येथे ऐंशी च्या दशकात सुरू झालेले व सध्या शहरातील सर्वात मोठे विद्यालय म्हणून नावलौकिक मिळवलेले श्री. म्हाळसाकांत विद्यालयाचे संस्थापकीय सदस्य निवृत्त अध्यापक वसंतराव देवचंद पाटील यांचे वयाच्या ८५ वर्षी वृद्धापकाळामुळे दिनांक २१/०९/२०१९ रोजी प्राधिकरण येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्याच्त पत्नी प्रमिला पाटील, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या अंत्यविधिस शहर परिसरातील नगरसदस्य नामदेव ढाके, अमित गावडे, बापू घोलप, बाबर, जयंत बागल, अमर आदियाल, प्रसेन अष्टेकर, सुहास करडे, सुहास सर, राजेंद्र बाबर, उद्योजक अबिषेक शेट्टी, अतुल काशीद, राजेंद्र साळूखें, डॉ.प्रताप सोमवंशी, डॉ.महेश मारणे, आबा सोनवणे, नंदकिशोर जगदाळे, प्राचार्य जयसिंग डुंबरे, हरिभाऊ मुळे, परशुराम शिंदे, कविता बेंडाळे, रजनी पाटील, वैशाली कदम, अँड विद्या शिंदे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजी माजी पदाधिकारी शिक्षक वृंद, कृष्णा सहकारी सोसायटी चे पदाधिकारी सदस्य, साईराज कॉलनी सभासद, सिंधुनगर युवक मित्र मंडळाचे कार्यकर्ते, घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक, प्राधिकरण सुरक्षा समितीचे सदस्य पदाधिकारी, कॅम्प एज्युकेशन सोसायटी संस्थेचे प्राध्यापक, पोलीस मित्र संघटनेचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, प्रवचनकार, ज्योतिष पंडित, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे बहुअंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची शहर परिसरात तसेच खान्देशातही मोठी ख्याती होती. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील अमडदे येथील दत्त संप्रदायाचे संत ऋषीतुल्य काशिनाथ बापूजी पाटील यांचे ते शिष्य होते. पुणे शहर परिसर, धुळे, जळगाव जिल्ह्यातही त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, माजी शिक्षण शालेय मंत्री प्राध्यापक कै. रामकृष्ण मोरे यांचे ते निकटवर्तीय होते. सोमवार, दिनांक ३०/०९/२०१९ रोजी त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने चिंचवड मोरया गोसावी मंदिर, पवना घाट येथे सकाळी ९.०० वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.















