न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- २९ ऑगस्ट रोजी आरोपी किशोर यांनी शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि किशोर केसवाणी यांना शिवसेना व्यापारी सेल, पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फ्लेक्स लावले. या फ्लेक्ससाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. पिंपरी कॅम्प परिसरातील वैष्णोदेवी चौक आणि इतर परिसरात हे फ्लेक्स लावले.
या फ्लेक्ससाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. पिंपरी कॅम्प परिसरातील वैष्णोदेवी चौक आणि इतर परिसरात हे फ्लेक्स लावले.
जाहिरात करण्यासाठी फ्लेक्स लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू किंमतराम आसवानी (वय ५१, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, किशोर केसवाणी (रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २८४, २४५ आणि मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















