न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसातच पवार साहेबांनी सत्ताधारी भाजपला झंजावाती दौरे व जनसंपर्क करून नाकीनऊ आणले आहेत. त्यामुळे विधानसभेला शरद पवार साहेबांमुळे भाजपला धोका होऊ शकतो, हे समोर दिसू लागले आहे. त्यामुळेच (ED ) ने या गुन्ह्यामध्ये पवार साहेबांचे नाव गोवण्यात आले आहे. उद्याच्या काळात भाजपाच्या विरोधात कोणीही बोलूच नये व अन्यायाबाबतही बोलू नये अशी हुकूमशाही भाजपने चालवलेली आहे.
तसेच सर्व सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक भयभीत रहावा, हीच खेळी आहे. त्यामुळे अशा हुकूमशाहीचा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व शहरातील नागरिक लोकशाही मार्गाने विरोध करत असून शुक्रवार (दि. २७ सप्टेंबर २०१९) रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करीत आहोत.
पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील आय-टी, उद्योग, कारखाने, ऑटोमोबाईल सेक्टरच्या उभारणीत शरद पवार साहेबांचे योगदान महाराष्ट्राला माहित आहे की, उद्याचा आपला महाराष्ट्र राहण्यासाठी पवार साहेबांचे पन्नास वर्षांचे योगदान विसरणे शक्य नाही. सर्वसामान्यांना सुद्धा अत्याचार व पोलिसांसारख्या यंत्रणांचा दबाव-हुकूमशाही प्रमाणे करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, शाळा, व्यापारी, संस्था, उद्योजकांनी या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन स्वत:च्या हक्कासाठीच्या या बंदमध्ये पाठींबा देवून सहभागी व्हावे.















