न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- भोसरीमधील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर पादचारी मार्गावर दुकान मांडून बसणा-या तरुणास पाच जणांनी मिळून लुटले. दरम्यान, एकाने हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवली.
या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या. तर फरार असलेल्या चौथ्या गुन्हेगाराला देखील भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
सनी उर्फ सँडी कन्हैयालाल गुप्ता (वय २४, रा. बो-हाडे वस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर यापूर्वी शिवाजी खरात, विकास जैसवाल, गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (रा. नारायण रसाळ चाळ, मंडई जवळ, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय २१, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.












