न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- पुण्यात पावसामुळे हाहाकार माजला असून प्रचंड नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानाने जीव धोक्यात घालून १० महिन्याच्या बाळाला जीवनदान दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक येथे हे बाळ आपल्या कुटुंबासहित अडकलं होतं. बचावकार्य सुरु असताना अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी या बाळाची सुखरुप सुटका केली. त्यांनी बाळाला टबमध्ये ठेवत टायरच्या सहाय्याने बाहेर आणलं.












